Gulfsha Bano Gharvapsi : उत्तरप्रदेशात मुसलमान युवतीने हिंदु धर्म स्वीकारून केला हिंदूशी विवाह  !

गुलफशा बानो आणि सूरज पाल वैदिक पद्धतीने विवाह

लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेशातील बरेली जिल्ह्यातील एका मुसलमान युवतीने हिंदु धर्म स्वीकारला आहे. या मुलीचे नाव गुलफशा बानो असे आहे. हिंदु धर्म स्वीकारल्यानंतर  तिचे रोशनी पाल असे नामकरण करण्यात आले. यानंतर तिने सूरज पाल या हिंदु युवकाशी वैदिक पद्धतीने विवाह केला. रोशनी पाल हिने सांगितले, ‘‘मी सूरजशी असलेल्या नात्याविषयी माहिती माझ्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर माझ्या आईने मला घराच्या छतावरून ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यापुढे सूरज याच्याशी संबंध ठेवल्यास त्याला ठार मारू, अशी धमकीही मला देण्यात आली.

मुसलमान युवतीने स्वीकारला हिंदु धर्म

(लव्ह जिहादला विरोध करणार्‍या हिंदूंना तत्त्वज्ञान सुनावणारे निधर्मीवादी मुसलमानांना उपदेशाचे डोस पाजत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक) सूरज याच्या संपर्कात आल्यानंतर मी हिंदु धर्माकडे आकर्षित झाले आणि हिंदु धर्म स्वीकारला.’’