Odisha Assembly Election Result : ओडिशामध्ये सत्तेच्या चाव्या भाजपकडे !
बीजेडीचा पराभव करत सत्ता मिळवली
भुवनेश्वर – ओडिशामधील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी बिजू जनता दलला (बीजेडीला) पराभूत करून भाजपने यश संपादन केले आहे. मागील २७ वर्षे बीजेडी पक्ष सत्तेत होता. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा लोकांवर प्रभाव असल्यामुळे बीजेडीला ओडिशामध्ये पराभूत करणे अशक्य मानले जात होते. या पार्श्वभूमीवर त्यांना पराभूत करून सत्तेत येणार्या भाजपचा हा ऐतिहासिक विजय मानला जात आहे. ओडिशा विधानसभेत एकूण १४७ जागा आहेत. सत्तेत येण्यासाठी ७४ जागांची आवश्यकता असते. भाजप ७८ जागांवर आघाडीवर असून बीजेडी पक्ष ५३ जागांवर आघाडीवर आहे.
BJP holds the keys to power in Odisha!
Gains power by defeating BJD#electionresultupdate #Odisha#bjp2024 #JaiJagannath
Watch BJP workers celebrating their winpic.twitter.com/GmvjaxY5mx
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 4, 2024
नवीन पटनाईक यांचे अनेक मंत्र्यांची पिछेहाट झाली आहे. यामध्ये वनमंत्री पी.के. अतम, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री अशोक पंडा, अर्थमंत्री बिक्रम अरुक्षा, खाणमंत्री प्रफुल्ल मल्लिक यांचा समावेश आहे.