गोव्यातील बागा समुद्रकिनार्‍यावरील ‘कॅफे अरूबा क्लब’ला टाळे

गुजरातमधील पर्यटकाला लुटल

प्रतिकात्मक छायाचित्र

म्हापसा, ३ जून (वार्ता.) – लैंगिक व्यवहाराविषयीचे आमीष दाखवून गुजरातमधील पर्यटकाकडून ४४ सहस्र रुपये लुटल्याच्या प्रकरणी बागा समुद्रकिनार्‍यावरील ‘कॅफे अरूबा क्लब’ला मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून संबंधित अधिकार्‍यांनी टाळे ठोकले आहे. या क्लबमध्ये काम करणारे वरूण प्रजापती (वय २९ वर्षे) आणि चंदन घाडाई (वय २८ वर्षे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही सध्या कळंगुट येथे रहात होते. सबरकांथा, गुजरात येथील भवन पटेल ‘कॅफे अरूबा या क्लबमध्ये त्याची फसवणूक करून त्याच्याकडून ४४ सहस्र रुपये कसे लुटण्यात आले’, हे सांगत असलेला व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला होता. त्यानंतर कळंगुट पोलिसांनी भवन पटेल यांना पोलीस ठाण्यात बोलावून संबंधितांच्या विरोधात तक्रार नोंदवली. यासंबंधी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका 

पर्यटकांची फसवणूक झाल्याने गोव्याची देशभरात आणि विदेशात अपकीर्ती होऊन पर्यटन व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होतो. पर्यटकांची फसवणूक करणार्‍यांच्या विरोधात उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ शासनाप्रमाणे क्लब किंवा रेस्टॉरंट यांच्यावर बुलडोझर का फिरवू नये ?