कल्याणीनगर (पुणे) येथे नाकाबंदीच्या वेळी पोलीस अधिकार्याने पाय दाबून घेतल्याची चित्रफीत प्रसारित !
आरोप चुकीचा, पोलीस अधिकार्यांचे म्हणणे !
पुणे – येरवडा पोलिसांकडून कल्याणीनगर चौकामध्ये नाकाबंदी करण्यात आली होती. या वेळी पडताळणीसाठी थांबवलेल्या एका युवकाकडून उपस्थित असणार्या पोलीस अधिकार्याने पाय दाबून घेतल्याची चित्रफीत प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. येरवडा वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गोरडे हे त्या ठिकाणी नाकाबंदीला उपस्थित असल्याचे प्रसिद्धी माध्यमांतून लक्षात येत आहे. येरवडा वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गोरडे म्हणाले, ‘‘सलग २ दिवस रात्रपाळी केली. कल्याणीनगर येथे नाकाबंदी करत असतांना माझ्या पायात गोळा आला. मी खुर्चीवर बसलो होतो. तेव्हा २ तरुणांनी ‘काय झाले ?’, अशी विचारणा करून ‘पाय दाबून देऊ काय ?’, अशी विचारले असता मी ‘हो’ म्हटल्यावर त्यांनी पाय चोळून दिला. तपासणीसाठी पकडलेल्या तरुणांकडून पाय दाबून घेतल्याचा आरोप चुकीचा आहे.’’