‘प्रिन्स शिवाजी’मध्ये अभियांत्रिकीचा पदवी अभ्यासक्रम चालू करण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून मान्यता !

कोल्हापूर, ३ जून (वार्ता.) – ‘श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर’, या संस्थेच्या उंचगाव येथील ‘न्यू पॉलिटेक्निक महाविद्यालया’मध्ये अभियांत्रिकेचा पदवी अभ्यासक्रम चालू करण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून मान्यता मिळाली आहे. त्याचसमवेत ‘न्यू पॉलिटेक्निक’चे नामांतर आता ‘न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’, असे झाल्याची माहिती अध्यक्ष डॉ. के.जी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी प्राचार्य डॉ. संजय दाभोळे उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. संजय दाभोळे म्हणाले, ‘‘उच्चशिक्षित, अनुभवी प्राध्यापक, अद्ययावत् प्रयोगशाळा, डिजिटल ग्रंथालय, विकासात्मक उपक्रम, औद्योगिक सुसंवाद यांतून उद्योगस्नेही अभियंते घडवण्यासमवेत कोल्हापूर हे उत्कृष्ट शैक्षणिक केंद्र बनवण्याचे आमचे ध्येय आहे. नवीन अभ्यासक्रमात ‘मेकॅनिकल ॲन्ड मेकॅट्रॉनिक्स’, ‘इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड पॉवर’, ‘कम्प्युटर सायन्स’, ‘कम्प्युटर सायन्स (ए.आय.एम्.एल्.) हे उदयोन्मुख कल असलेले पदवी अभ्यासक्रम उपलब्ध असतील.’’