नशिराबाद (जिल्हा जळगाव) येथे छेड काढणार्या धर्मांधास ३ हिंदु मुलींकडून चोप; ३ धर्मांधांना अटक !
जळगाव, ३ जून (वार्ता.) – जिल्ह्यातील नशिराबाद येथे एका अल्पवयीन हिंदु तरुणीची छेड काढल्यानंतर धर्मांध मारोब शेख नयीम मण्यार (वय २० वर्षे) याला ३ हिंदु मुलींनी चोप दिला. या वेळी हिंदु आणि मुसलमान २ गटांतील लोकांमध्ये नशिराबाद पोलीस ठाण्यासमोर वादावादी आणि एकमेकांवर दगडफेक झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी मध्यस्थी केली. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी मारोब शेख नयीम मण्यार यांसह ३ धर्मांधांना अटक केली आहे. यातील मण्यार याच्यावर भारतीय दंड विधान संहिता कलम ३५४ अंतर्गत विनयभंग आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
१. आरोपी गेल्या १ महिन्यापासून अल्पवयीन पीडित हिंदु मुलीच्या मागावर होता. धर्मांध मणेर याने ३ दिवसांपूर्वी तिला नाव आणि भ्रमणभाष क्रमांक लिहून चिठ्ठी दिली; मात्र तिने चिठ्ठी त्याच्यासमोरच फाडून टाकली. यामुळे त्याच्या मनात मुलीविषयी राग होता.
२. २ जून या दिवशी ती एकटी घराबाहेर जात असतांना धर्मांधाने तिला पकडून ‘तू मला पुष्कळ आवडतेस, तू हो म्हण’, असे म्हणून तिचा विनयभंग केला. (प्रसंगावधान राखून संघटितपणे धर्मांधाला क्षात्रवृत्तीने चोप देणार्या हिंदु तरुणींचे अभिनंदन ! – संपादक)
३. या वेळी मुलीची बहीण आणि तिच्या २ अल्पवयीन मैत्रिणी मुलीला धर्मांधाच्या तावडीतून सोडवत असतांना त्याने मुलीला ढकलून दिले. त्यानंतर संतप्त ३ मुलींनी मण्यार याला चोप दिला.
४. मण्यार याच्या २ साथीदारांनी त्याला सोडवून तेथून पळ काढला. थोड्या वेळाने नशिराबाद पोलीस ठाण्याबाहेर हिंदु आणि मुसलमान समोरासमोर आले. त्या गटांतील लोकांमध्ये वाद होऊन दगडफेक झाली.
५. या वेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘पीडित अल्पवयीन तरुणीची छेड काढणार्या आरोपींना अटक व्हावी आणि त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा व्हावी’, या मागणीसाठी पोलीस ठाण्याबाहेर हिंदू आक्रमक झाले होते.
संपादकीय भूमिकाजाणूनबुजून हिंदु तरुणींची छेड काढणार्या धर्मांधांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे. अशा धर्मांधांच्या विरोधात संघटित होणार्या हिंदूंचे अभिनंदन ! हिंदूंनो, स्वतःवरील अत्याचारांच्या विरोधात असा संघटितपणे लढा दिला पाहिजे. |