अंघोळ करण्यास विरोध केल्याने पतीकडून पत्नीवर चाकूने आक्रमण !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – येथे ५ टक्के पाणीकपात चालू असल्याने बाहेरून घरी आल्यावर अंघोळीला जाणार्‍याला पतीला पत्नीने विरोध केला. तेव्हा रागाच्या भरात पतीने तिच्यावर चाकूने आक्रमण केले. त्यात ती गंभीर घायाळ झाली. तिच्यावर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी आरोपी पतीविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला असून त्याला अटक करण्यात आली आहे. परमात्मा गुप्ता असे आरोपीचे नाव आहे.