Pakistan at UN Security Council : पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य देश बनणार !
या आठवड्यात होणार घोषणा !
इस्लामाबाद – पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य देश बनणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. २०२५-२०२६ या कालावधीसाठी पाकिस्तानची निवड होणार आहे. ६ जून या दिवशी पाकिस्तानच्या सदस्यत्वाची घोषणा केली जाऊ शकते. यापूर्वी वर्ष २०१३ मध्ये पाकिस्तानचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ‘तात्पुरता सदस्य देश’ म्हणून समावेश करण्यात आला होता. पाकिस्तानच्या प्रवेशामुळे भारताची डोकेदुखी वाढू शकते, असे जाणकारांचे मत आहे. चीन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य आहे. अशा परिस्थितीत चीन आणि पाकिस्तान भारताविरुद्ध आघाडी निर्माण करू शकतात.
Pakistan to become a Non Permanent member of the United Nations Security Council.
This will be Pakistan’s 8th term at UNSC, last time Pakistan was at UNSC was in 2013.#UNSC #GeneralAssembly pic.twitter.com/ki4NUKtPYO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 3, 2024
पाकिस्तान आणि भारत हे दोघेही संयुक्त राष्ट्रांच्या एशिया-पॅसिफिक गटाचे सदस्य आहेत, ज्यांच्या सुरक्षा परिषदेत प्रत्येकी दोन जागा आहेत. या गटात ५० हून अधिक सदस्य आहेत, जे सुरक्षा परिषदेच्या सदस्यत्वासाठी एका निश्चित प्रणालीचे अनुसरण करतात. याचा अर्थ भारत आणि पाकिस्तान या गटाचे उमेदवार म्हणून एकमेकांना मत देतात. त्यामुळे वर्ष २०१९ मध्ये पाकिस्तानने भारताला पाठिंबा दिला होता आणि या वर्षी भारताने पाकिस्तानला साथ देण्याची अपेक्षा आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ५ कायमस्वरूपी आणि १५ तात्पुरते (हंगामी) सदस्य आहेत.चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य आहेत. त्यांना सुरक्षा परिषदेत ‘व्हेटो’ (विशेषाधिकार) अधिकार आहे. १५ तात्पुरत्या सदस्य देशांची निवड २ वर्षांसाठी असते.