प्रतिदिन सकाळी सत्संकल्पांचे मनन-चिंतन करा !
‘प्रतिदिन सकाळी झोपेतून लवकर उठून आपल्या आरोग्याविषयी, सत्प्रवृत्तीविषयी, जीवनदात्याच्या साक्षात्काराविषयी आणि प्रार्थना, प्रेम, पुरुषार्थ यांच्या संकल्पाविषयी मनात मनन-चिंतन करा. मनाने तळहाताचे दर्शन घेऊन हात तोंडावरून फिरवा आणि नंतर भूमीवर पाय ठेवा. यामुळे प्रत्येक क्षेत्रात आपली पावले पुढे जातात.’
सदा दिवाळी कुणाची ?
‘दीपमाळा लावून, फटाके उडवून दिवाळी साजरी करतात. ‘नूतनवर्षाचे अभिनंदन’, म्हणून नूतनवर्ष साजरे करतात; परंतु आत्मदीप लावून, अहंकाराचा फटाका फोडून जो सोहम् स्वरूपात स्थित होतो, त्याची सदा दिवाळी आहे.’
(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)