‘भगवंताविना या जगात दुसरे कुणीही नाही’, या भावनेने रहावे !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

भगवंत आणि त्याचे नाम एकरूपच असल्याने त्या दोहोंच्या आड काहीच येऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागून आपण चाललो असतांना आपल्या तोंडून त्याचे नाव उच्चारले गेले, तर तो लगेच मागे वळून बघतो. ही जर मनुष्याची स्थिती, तर भगवंताविषयी त्याचे नाव त्याच्यापर्यंत पोचत नाही, हे कसे शक्य आहे ? आपण ज्याच्या पोटी जन्माला आलो, त्याचेच नाव आपण आपल्या नावापुढे लावतो, तसे भगवंताविषयी करावे. त्याचेच नावाने जगावे, म्हणजे ‘माझा सर्व कर्ता, रक्षिता, तो एकच असून त्याच्याविना माझे या जगात दुसरे कुणीही नाही’, या भावनेने रहावे. असा जो भगवंताचा होतो, त्याचे महत्त्व भगवंत स्वत:पेक्षाही अधिक वाढवतो.

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज (‘पू. प्रा. के.व्ही. बेलसरे यांचे आध्यात्मिक साहित्य’ या फेसबुकवरून साभार)