गोंदेगाव (जिल्हा संभाजीनगर) येथील मशिदीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग !
मौलाना विरुद्ध ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंद !
सोयगाव – अरबी शिक्षण घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार ३० मेच्या रात्री ८ वाजता गोंदेगाव येथे घडला. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून ३१ मे या दिवशी मौलाना अयूब खान समशेर खान पठाण (वय ५२ वर्षे) याच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपीला अटक केली. आरोपीने मदरशामधील सर्व मुला-मुलींना घरी पाठवून अल्पवयीन पीडितेचा विनयभंग केला.
संपादकीय भूमिकाहे आहे मौलानांचे खरे स्वरूप ! अशा वासनांधांना कारागृहातच डांबायला हवे ! |