पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आई-वडिलांना ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी !
पुणे – कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईने; म्हणजे शिवानी अग्रवालने मुलाच्या ऐवजी स्वतःचे रक्त पडताळणीसाठी दिल्याचे पोलीस अन्वेषणात समोर आले आहे, तर अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनी या प्रकरणात साहाय्य केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीच्या आई-वडिलांना २ जून या दिवशी दुपारी सुटीकालीन न्यायालयात उपस्थित केले होते. या प्रकरणात आरोपीच्या आई-वडिलांना विशेष न्यायालयाने ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरि हळनोर, शिपाई घटकांबळे यांच्याही पोलीस कोठडीत विशेष न्यायालयाने वाढ केली आहे.