लांजा येथील पू. (श्रीमती) माया गजानन गोखले यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे
१. लांजा येथे आमच्या वसाहतीत पू. (श्रीमती) माया गजानन गोखलेआजी (सनातनच्या ८१ व्या (व्यष्टी) संत, वय ७८ वर्षे) रहातात. पू. आजींचे मला व्यष्टी साधनेच्या संदर्भात नेहमीच मार्गदर्शन लाभते.
२. त्यांच्याकडे गेल्यावर त्या नेहमीच मायेने माझ्या पाठीवरून हात फिरवतात. त्या वेळी मला ऊर्जा मिळते. माझ्या मनातील नकारात्मक विचार नष्ट होऊन मन स्थिर होते. त्यांच्या हाताचा स्पर्श कापसासारखा मऊ लागतो. त्यांची त्वचा लहान बाळासारखी मुलायम जाणवते.
३. पू. आजींच्या चरणांकडे पहातांना ‘त्यांचे चरण सच्चिदानंद परब्रह्म प.पू. गुरुदेवांचे चरण आहेत’, असे मला वाटते. ‘त्या गुरुदेवांच्या चरणांशी एकरूप झाल्या आहेत’, असे वाटते. ते पाहून मनाला शांत वाटते.
‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेनेच त्यांचे रूप मला पू. आजींच्या माध्यमातून अनुभवायला मिळते. त्याबद्दल प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. प्रीती नीलेश जोशी, लांजा, रत्नागिरी. (२२.४.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |