Ravina Tandon Accident : (म्हणे) ‘अभिनेत्री रविना टंडन यांनी वृद्ध महिलेला कारद्वारे धडक देऊन तिला मारहाण केली !’  

  • धर्मांधांच्या टोळीकडून धादांत  खोटा आरोप !

  • मोहसीन शेख नावाच्या धर्मांध वार्ताहराकडून खोटा व्हिडिओ प्रसारित !

  • धर्मांधांच्या टोळीकडून रविना टंडन यांच्यावरच आक्रमण !

मुंबई – अभिनेत्री रविना टंडन यांच्या घराबाहेर एका समारंभासाठी एक बुरखाधारी महिला आली होती. रविना टंडन यांनी या महिलेच्या शेजारून अंदाज घेत हळू गाडी पुढे नेली. तरीही मुसलमानांच्या टोळीने रविना टंडन यांनाच घेराव घातला आणि त्यांच्यावर ‘वृद्ध महिलेच्या अंगावर गाडी घातली, तसेच तिला मारहाण केली’, असा आरोप करत त्यांच्यावर आक्रमण केले. प्रत्यक्षात मात्र मुसलमान टोळीने रविना टंडन यांच्यावर आक्रमण केल्याने त्या त्यांना ‘मला मारू नका’, अशी विनंती करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या व्हिडिओत रविना या भांबावलेल्या दिसत आहेत.


मोहसीन शेख या वार्ताहराने संबंधित वृद्ध महिलेच्या मुलाचा धादांत खोटा व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात अहमद नावाचा माणूस सांगत आहे, ‘‘रविना टंडन यांच्या गाडीने माझ्या आईला धडक दिली. त्या वेळी त्या दारूच्या नशेत होत्या आणि त्यांनी माझ्या आईला मारहाण केली. त्यामुळे आईच्या डोक्याला जखम झाली. खार पोलीस ठाण्यात ४ घंटे बसूनही आमची तक्रार कुणीही नोंदवून घेत नाही. आम्हाला तडजोड करण्यास सांगितले जात आहे.’’

अशा टोळ्या मुंबईत कार्यरत ! – लोकांच्या प्रतिक्रिया

सिन्हा यांनी ‘एक्स’वर टाकलेला संबंधित व्हिडिओखालील प्रतिक्रियांमध्ये वाचकांनी म्हटले आहे, ‘अशा टोळ्या मुंबईत कार्यरत आहेत.’, ‘हा ‘शांतीदूतां’चा जमाव अक्षरशः तिला लिंच (जमावाने आक्रमण करून ठार मारणे) करत आहेत.’, ‘हे शांतीदूत सगळीकडे समस्या निर्माण करतात.’, ‘जर प्रसिद्ध व्यक्तींसमवेत असे होऊ शकते, तर सामान्य माणसांसमवेत काय होत असेल ?’

निश्‍चिती न करता उतावीळपणे असत्य वृत्ते प्रसारित करणार्‍या वृत्तवाहिन्या !

अभिनेत्री रविना टंडन यांच्या गाडीचा वृद्ध मुसलमान महिलेला स्पर्शही झाला नसल्याचे सीसीटिव्ही चित्रीकरणात स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओही प्रसारित झाला आहे. असे असूनही काही वृत्तवाहिन्यांनी ‘रविना टंडन याच्या वाहनाने वृद्ध महिलेला धडक दिली’ असे वृत्त दिले. गाडी अत्यंत हळू असूनही ‘रविना या गाडी बेदरकारपणे गाडी चालवली’, अशा प्रकारे खोटी वृत्ते प्रसारित केली.

संपादकीय भूमिका

येनकेन प्रकारेण हिंदूंना त्रास देण्याचा हा प्रकार नव्हे का ? असे खोटारडेपणे वागून समाजात तेढ निर्माण करण्याचा तर धर्मांधांचा उद्देश नव्हता ना ?, याची चौकशी पोलीस करणार का ?