Sweden Mosque : स्विडनमध्ये मशिदीबाहेर फेकण्यात आले मृत डुक्कर !

मशिदीबाहेर फेकलेले मेलेले डुक्कर

स्कोव्हडे (स्विडन) – येथे २८ मेच्या रात्री अज्ञाताने मशिदीबाहेर मेलेले डुक्कर फेकले. या घटनेनंतर पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला. मुसलमानांमध्ये डुक्कर निषिद्ध मानले जाते.

मशीद चालवणार्‍या संस्थेचे प्रमुख स्माजो सहात यांनी सांगितले की, रात्री उशिरा एक व्यक्ती चारचाकीतून आली आणि त्याने डुकराला मशिदीजवळ फेकून दिले. ती व्यक्ती कोण होती ? किंवा ती कुठून आली ?, हे आम्हाला ठाऊक नाही. ही मशीद वर्षभरापूर्वीच चालू झाली आहे. तेव्हापासून मशिदीला कोणतीही धमकी मिळालेली नाही.

निर्वासित मुसलमानांच्या समस्येशी झगडत असलेल्या स्विडनमध्ये अनेक दिवसांपासून मुसलमानांच्या विरोधात घटना घडत आहेत. या वर्षी मे महिन्याच्या आरंभी सरकारने एका प्रकरणात लोकांना कुराण जाळण्याची अनुमती दिली होती.