शिवानी अग्रवाल यांनी स्वत:च्या रक्ताचे नमुने दिल्याची कबुली !
पुणे – पोर्शे कारच्या अपघाताच्या प्रकरणात महत्त्वाच्या घडामोडी झाल्या आहेत. अल्पवयीन मुलाचे ससून रुग्णालयामधील घेण्यात आलेले रक्ताचे नमुने डॉ. श्रीहरि हळनोर यांनी कचर्याच्या डब्यात टाकले होते. त्या ऐवजी अन्य रक्ताचे नमुने पाठवले होते. हे रक्ताचे नमुने कुणाचे होते ? असा प्रश्न उपस्थित होत होता. याविषयी मुलाच्या आईने म्हणजे शिवानी अग्रवाल यांनी ते रक्ताचे नमुने त्यांचेच आहेत, असे मान्य केले आहे. त्यांनी आणि मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांनी मिळून हा कट रचला होता. ते दोघेही तेव्हा ससून रुग्णालयात उपस्थित होते, तसेच ‘मुलगाच गाडी चालवत होता’, हे शिवानी अग्रवाल यांनी कबूल केले आहे.