नागपूरस्थित आस्थापनाच्या २ संचालकांना सश्रम कारावासासह ७० लाख रुपये दंडाची शिक्षा !
कोळसा ब्लॉक वाटप प्रकरण
नागपूर – कोळसा ब्लॉक वाटप प्रकरणात केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘सीबीआय’च्या) नामित न्यायालयाने एका खासगी आस्थापाच्या २ संचालकांना २-३ वर्षांचा सश्रम कारावास आणि ७० लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. नागपूर येथील खासगी आस्थापन ‘मेसर्स बीएस इस्पात लिमिटेड’चे संचालक मोहन अग्रवाल आणि राकेश अग्रवाल यांना शिक्षा सुनावण्यात आली.
महाराष्ट्रातील मार्की-मांगली-१ कोळसा ब्लॉकच्या फसवणुकीशी संबंधित प्रकरणात आरोपी मोहन अग्रवाल यांना १० लाख रुपयांच्या दंडासह ३ वर्षांची शिक्षा, तर राकेश अग्रवाल यांना १० लाख रुपयांच्या दंडासह २ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कोळसा ब्लॉकसाठी आवेदन सादर करतांना आणि कोळसा खाण वाटपाच्या आवेदनावर प्रक्रिया करतांना आरोपींनी आस्थापनाच्या अस्तित्वाविषयी खोटी माहिती सादर केली होती. या आरोपावरून ‘सीबीआय’ने ३१ मार्च २०१५ या दिवशी गुन्हा नोंद केला होता. सीबीआय अभियोजन पथकाने ३१ साक्षीदार पडताळले.
संपादकीय भूमिकासर्व यंत्रणा हाताशी आणि भरघोस वेतन असतांनाही असे कृत्य करणार्या आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा झाली पाहिजे. |