प्रजाहितदक्ष अहिल्यादेवी होळकर यांनी कुशलतेने राज्यकारभार केला ! – सौ. संगीता खोत, माजी महापौर
मिरज – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अतिशय कुशलतेने राज्यकारभार केला. त्यांनी नेहमीच प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. अनेक मंदिरांचा जिर्णाेद्धार अहिल्यादेवी यांनी केला. यात प्रामुख्याने सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर, काशी विश्वेश्वर, महाकालेश्वर आदी मंदिरांचा समावेश असून चार धामांच्या ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, बाग, कुंडे, धर्मशाळा बांधून यात्रेकरूंची सोय केली, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या आणि सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या माजी महापौर सौ. संगीता खोत यांनी केले. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयांमध्ये अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती साजरी करण्यात आली. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
या प्रसंगी माजी नगरसेविका जयश्री कुरणे, गीता कुरणे, गायत्री सातपुते, सीमा मगदूम, अनुराधा जोशी, अंजना कडोले, वैशाली वाणी, सुप्रिया जोशी, उज्ज्वला सातपुते, सुनंदा खोत उपस्थित होत्या.