हेरगिरी करणार्‍या उपग्रहाची चाचणी करणार्‍या उत्तर कोरियाचा अमेरिकेकडून निषेध

वॉशिंग्टन – काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने हेरगिरी करणारा उपग्रह प्रक्षेपित केला होता; मात्र त्याचा स्फोट झाला. यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने तातडीच्या बैठकीत अमेरिकेने उत्तर कोरियाचा निषेध केला. अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांनी तिच्या भूमिकेचे समर्थन केले. याउलट चीन आणि रशिया यांनी उत्तर कोरियाला पाठिंबा दिला. ‘उपग्रहाची चाचणी घेऊन उत्तर कोरियाने संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाचे उल्लंघन केले. चाचणीमुळे कोरियन द्वीपकल्पातील शांतता आणि नि:शस्त्रीकरणाला धोका निर्माण झाला आहे’, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.

अमेरिकेच्या प्रतिनिधीने म्हटले की, उत्तर कोरिया बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्र निर्मितीचा कार्यक्रम वेगाने वाढवत आहे. सुरक्षा परिषदेतील देशांनी याविषयी विचार करावा. जेणेकरून उत्तर कोरियावर कारवाई करता येईल.