आदर्श व्यक्तीमत्त्व
‘आदर्श’ याचा अर्थ ज्याचा इतरांनी कित्ता गिरवावा असे. ‘व्यक्तीमत्त्व’ हा एक आकृतीबंध असतो. व्यक्तीच्या वर्तनातून सातत्याने आणि सुसंगतपणे प्रकट होणार्या गुणविशेषांची ती एक घडण असते. व्यक्तीचे काही गुण अनुवांशिक परंपरेने संक्रमित झालेले असतात, तर काही गुण ही व्यक्तीची स्वतःची कमाई असते. त्यात परिस्थितीचा वाटा मोठा असतो. अनुवांशिक आणि परिस्थिती यांच्या सहयोगातून सिद्ध होणारे सजीव शिल्प म्हणजे व्यक्तीमत्त्व. व्यक्तीमत्त्वाचे हे लेणे जीवनगुंफेत वर्षानुवर्षे खोदले जाते. लेण्यांमधील मूळचा पाषाण तोच; पण संस्काराची छिन्नी त्यावर चालत रहाते. घडता घडता आकाराला येणारा हा महाल घडतच रहातो.’
– डॉ. शुभा साठे, नागपूर (साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, जुलै-सप्टेंबर २०२३)