राज्यात दुष्काळाची भयावहता !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – राज्यात पश्चिम महाराष्ट्रात, तसेच मराठवाड्यात भीषण दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी आणि चारा यांची प्रचंड मोठी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी विहिरी आटल्याने हंडाभर पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटर चालत जावे लागत आहे. चारा नसल्याने जनावरे विकावी लागत आहेत. फळबागा करपून गेल्या आहेत. अनेक शहरांना १५ दिवसांनी पाणी मिळत आहे. आचारसंहिता असल्याने पाण्याचे टँकर, रोजगार हमीची कामे, चारा छावण्या अद्याप चालू झालेली नाहीत. मराठवाड्यातील दुष्काळ गंभीर असून अवकाळी पाऊस आणि गारपीट यांमुळे हानी झाली आहे.

मराठवाड्यात ३ महिन्यांत २६७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. बियाण्यांवर १८ टक्के जी.एस्.टी. लावला असून बियाण्यांच्या किमती ३५ ते ३८ टक्के वाढल्या आहेत. खताचे अनुदान काढल्यामुळे खतांचे भाव वाढले आहेत.