Namaz Jihad : कर्नाटकात रस्त्यावर नमाजपठण करणार्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवणार्या पोलीस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवले !
मंगळूरू – शहरातील काही धर्मांधांनी कंकनाडी मशिदीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर नमाजपठण केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला. या प्रकरणाची स्वतःहून नोंद घेऊन गुन्हा नोंदवणारे पोलीस निरीक्षक सोमशेखर यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. धर्मांधांनी दबाव आणल्यामुळे त्यानां रजेवर पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. (हिंदूंवर मर्दुमकी गाजवणारे पोलीस धर्मांधांसमोर नांगी टाकतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)
या घटनेनंतर पोलिसांवर टीका होत आहे. या प्रकरणी मंगळुरू नगर पोलीस आयुक्त अनुपम अग्रवाल म्हणाले की, या घटनेच्या संदर्भात सोमशेखर यांनी जेष्ठ अधिकार्यांना कुठलीही माहिती न देता स्वतःहून गुन्हा नोंदवला. (नियमानुसार एखादी कृती करण्यासाठी ज्येष्ठ अधिकार्यांची अनुमती का घ्यावी लागते ? यावरून कर्नाटकातील पोलीस दल धर्मांध आणि सत्ताधीश यांच्या ताटाखालचे मांजर बनले आहे, हे लक्षात येते ! – संपादक)
Police Inspector who registered a case against people offering Namaz on the street sent on compulsory leave!
📍Mangalore Karnataka
Case registered against VHP leader Sharan Pumpwell who warned through social media that the Bajrang Dal would take action if Namaz was again… pic.twitter.com/FpZkqZB5xd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 1, 2024
विश्व हिंदु परिषदेचे प्रमुख शरण पंपवेल यांच्याविरुद्धही गुन्हा नोंद !
‘रस्त्यात पुन्हा नमाजपठण केले, तर बजरंग दल कार्यवाही करेल’, असा सामाजिक माध्यमांतून चेतावणी देणारे विश्व हिंदु परिषदेचे प्रमुख शरण पंपवेल यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (चोर सोडून संन्याशाला फासावर लटकवणारे पोलीस ! – संपादक) यानंतर पंपवेल यांनी ‘संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी दिली आहे.
पोलिसांकडून न्यायालयात नवीन अहवाल सादर ; नमाजपठण करणार्यांना ठरवले निर्दोष
कंकनाडी मशिदीच्या समोरील रस्त्यावर काही धर्मांध सार्वजनिक वाहतूक अडवून रस्त्यावर नमाजपठण करत होते. प्रार्थना करत असल्यामुळे जनसामान्यदेखील त्यांना काहीही त्रास न देता शांत होते. प्रार्थना करत असतांना या रस्त्याने जाणारी वाहनेदेखील परत फिरून दुसर्या रस्त्याने जात होती, असा अहवाल पोलिसांनीच आता न्यायालयात सादर करत आरोपींना निर्दोष ठरवले आहे.
रस्त्यावर नमाजपठण करणार्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाचे कलम ३४१, २८३, १४३ आणि १४९ अंतर्गत पोलिसांकडून स्वतःहून प्रकरण नोंदवण्यात करण्यात आले; परंतु याला मुसलमान समुदाय आणि काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रमुख यांनी विरोध केल्याने पोलिसांनी वरील नवीन अहवाल सादर केला आहे.
संपादकीय भूमिका
|