Germany Muslim Attacked Speaker : जर्मनीमध्ये इस्लामविरोधी सभेत मुसलमानाकडून वक्त्यावर चाकूद्वारे आक्रमण
पोलिसांनी मुसलमानाला गोळ्या झाडून ठार मारले !
मॅनहेम (जर्मनी) – येथे एका सभेच्या वेळी जिहादी मुसलमानाने केलेल्या आक्रमणात वक्ता आणि एक पोलीस घायाळ झाले. या वेळी पोलिसांनी गोळीबार करून या जिहादी मुसलमानाला ठार मारले.
‘सिटिझन्स मूव्हमेंट पॅक्स युरोप’ हा एक गट युरोपच्या इस्लामीकरणाविरुद्ध आवाज उठवत आहे. मॅनहेम शहरात या गटाने सभा आयोजित केली होती. याचे थेट प्रक्षेपण यू ट्यूबवर केले जात होते. त्याच वेळी एका जिहादी मुसलमानाने मंचावर जाऊन मायकेल स्टुर्जेनबर्गर या वक्त्यावर चाकूने वार केले. यानंतर पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने एका पोलीस अधिकार्यावर आक्रमण केले. त्यानंतर दुसर्या पोलिसाने त्याच्यावर जवळून गोळी झाडली. यानंतर तो खाली पडला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.
जर्मनीमध्ये १० लाख निर्वासित मुसलमान !
अलीकडच्या काही महिन्यांत जर्मनीमध्ये मुसलमान निर्वासितांच्या संकटामुळे येथे वाद होत आहेत. जर्मनीत मुसलमान निर्वासितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. वर्ष २०१५ पासून आतापर्यंत १० लाख मुसलमानांनी जर्मनीमध्ये आश्रय घेतला आहे.
संपादकीय भूमिकाहिंसा करणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई कशी करावी ?, हेच जर्मनीच्या पोलिसांनी दाखवून अनेकांचे रक्षण केल आहे ! |