श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !
१. ‘केवळ कृती करणे, म्हणजे माया आणि प्रत्येक कृतीला सात्त्विकतेची जोड देणे, म्हणजे अध्यात्म !
२. ज्या ज्ञानात ईश्वर नाही, त्याचा उपयोग काय ?
३. ‘विज्ञान आणि अध्यात्म’ यांचा संगम साधून ‘राष्ट्र आणि धर्म’ यांच्या उत्कर्षासाठी झटणारे फार अल्प आहेत. अशांपैकी आपण एक बनणे, म्हणजे खर्या अर्थाने हिंदुत्व जोपासणे होय.’
४. ‘गुणवृद्धी होणे, म्हणजे आपल्यातील ईश्वरी तत्त्व वाढणे.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ