तोतया पोलीस बनून फसवणार्‍या धर्मांधाला अटक

फैजुल अबू हसन शेख अटक

वसई – वसईतील महेंद्रकुमार पुरोहित यांच्या दुकानातून फैजुल अबू हसन शेख (२८) याने १ लाख ६० सहस्र रुपयांचा भ्रमणभाष विकत घेतला होता. दुकानदाराची फसवणूक करण्यासाठी १ लाख १० सहस्र रुपयांचा रक्कम बँकेत एन्.एफ्.टी.द्वारे (राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण) हस्तांतर केल्याचे भासवले आणि तसा त्याला संदेश केला. ५० सहस्र रुपयांचा बनवाट धनादेश दिला होता. दुकानदाराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंद करून तपास केला. त्याला पोलिसांनी अटक केली.

आरोपीच्या हातात असलेल्या चावीला बेडी असलेली की-चेन दिसली. त्यामुळे पोलिसांनी बेडी असलेल्या ‘की-चेन’चा तपास केला. त्या वेळी तो नकली पोलीस बनून वावरत असल्याचे लक्षात आले. आरोपीकडे पोलिसांचे गणवेश, बनावट ओळखपत्र, नियुक्ती पत्रे, पोलीस वापरतात तशा एकूण ३० वस्तू आढळून आल्या.