नागपूर येथील ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. श्रीराधा नीरज आवदे (वय ५ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. श्रीराधा नीरज आवदे ही या पिढीतील एक आहे !

(‘वर्ष २०२४ मध्ये चि. श्रीराधा नीरज आवदे हिची आध्यात्मिक पातळी ५९ टक्के आहे.’ – संकलक)

वैशाख कृष्ण नवमी (१.६.२०२४) या दिवशी चि. श्रीराधा नीरज आवदे हिचा ५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई सौ. वर्षा नीरज आवदे यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

चि. श्रीराधा आवदे हिला ५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. साधनेची ओढ

अ. ती कृष्णाचा श्लोक म्हणूनच शाळेत जाते.

आ. शाळेत जातांना गाडीत बसल्यावर ती जयघोष, प्रार्थना आणि शाळेत जाईपर्यंत नामजप करते.

इ. रात्री झोपतांनाही ती नामजप आणि प्रार्थना करून झोपते.

२. धर्माचरणाची ओढ

ती शाळेत जाण्यापूर्वी स्वतःहून कुंकू लावते.

३. सात्त्विकतेची आवड

अ. चि. श्रीराधाला साधे आणि सात्त्विक जेवण आवडते.

आ. तिला सात्त्विक रंगच आवडतात.

४. इतरांचा विचार

आजोबा घरातून बाहेर जात असतांना ‘आजोबांना साहाय्य लागेल’, या विचाराने ती त्यांचा हात धरते. ती इतरांना साहाय्य करण्यासाठी नेहमीच तत्पर असते.

५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर असलेली श्रद्धा आणि भाव !

अ. मार्च मासात माझ्या नात्यातील एका काकूंचा पाय घसरून अपघात झाला. माझे भ्रमणभाषवर त्यांच्याशी झालेले बोलणे ऐकून श्रीराधा म्हणाली, ‘त्या आजींना परम पूज्यांना प्रार्थना करून नामजप करायला सांग. तेच तिला लवकर बरे करतील.

आ. ‘श्रीकृष्ण आणि परम पूज्यच आपल्याला सर्व देतात अन् आपले रक्षण करतात’, अशी तिची श्रद्धा आहे.

इ. परम पूज्यांवर श्रीराधाची पुष्कळ श्रद्धा आणि प्रेम आहे. एकदा ती मला म्हणाली, ‘‘परम पूज्यांनी मला बरेच दिवसांत प्रसाद पाठवला नाही.’’ तेव्हा गुरुदेवांच्या कृपेने दुसर्‍याच दिवशी सौ. गौरी जोशी यांच्याकडून सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी पाठवलेला प्रसाद मिळाला.

ई. ती नेहमी म्हणते, ‘‘मला परम पूज्यांच्या चरणांवर फुले वहायची आहेत आणि कृष्ण, परम पूज्य, हनुमंत अन् दुर्गादेवी यांच्यासाठी हार पाठवायचे आहेत.’’

६. स्वभावदोष

हट्टी आणि जिद्दी, भ्रमणभाष पहाणे.

‘मला श्रीराधाची गुणवैशिष्ट्ये लिहिण्याची संधी दिली’, यासाठी गुरुचरणी कृतज्ञता !’

– सौ. वर्षा नीरज आवदे (श्रीराधाची आई), नागपूर. (१७.४.२०२४)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर  ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक