मध्य रेल्वेचा जम्बो ब्लॉक

आस्थापनांकडून कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची मुभा !

मुंबई – मध्य रेल्वेने फलाटाच्या विस्ताराची कामे हाती घेण्यासाठी ३० मे च्या मध्यरात्रीपासून ६३ घंट्यांचा जम्बो ब्लॉक घेतला आहे. या काळात ९०० हून अधिक लोकल गाड्या रहित होणार आहेत. यासाठी अनेक आस्थापनांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना घरून कार्यालयीन काम करण्याची मुभा दिली आहे. वैद्यकीय क्षेत्र वगळता अनेक आयटी क्षेत्रातील खासगी आस्थापनांनी कर्मचार्‍यांना घरून कार्यालयीन काम करण्याची अनुमती दिली आहे. यासाठी भ्रमणभाष, तसेच अन्य आवश्यक उपकरणे घरी नेण्यास संबंधितांना सांगण्यात आले आहे. काही आस्थापनांनी कार्यालयाच्या जवळच कर्मचार्‍यांच्या निवासाची व्यवस्था केली आहे.