विशाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !
पुणे – विशाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर गुन्हा नोंद असून या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलास ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्यात आले असून त्याचे अन्वेषण करण्याची अनुमती पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे मागितली आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने पालटण्यात त्याच्या आईचा सहभागही समोर आले; मात्र पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्या घरी नव्हत्या, तसेच त्यांचा दूरभाषही बंद होता, असे पोलिसांनी सांगितले.