Azerbaijan Supports Pakistan : (म्हणे) ‘काश्मीर प्रश्नावर संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार उपाय शोधावेत !’ – अझरबैजानचे परराष्ट्रमंत्री जेहुन बायरामोव
पाकच्या भेटीवर असणार्या अझरबैजानचे परराष्ट्रमंत्री जेहुन बायरामोव यांचे विधान
इस्लामाबाद (पाकिस्तान) – अझरबैजान काश्मीर प्रश्नाच्या शांततापूर्ण निराकरणाचा समर्थक आहे. आमचा विश्वास आहे की, काश्मीरची समस्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार सोडवली जावी, असे मत अझरबैजानचे परराष्ट्रमंत्री जेहुन बायरामोव यांनी मांडले. ते २ दिवसांच्या पाकिस्तान दौर्यावर आहेत. त्यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री असणारे इशाक दार यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी काश्मीर सूत्रावरून पाकिस्तानचे समर्थन केले.
भारताने आर्मेनियाला पाठिंबा दिल्याने अझरबैजान अप्रसन्न !
अझरबैजान भारतावर अप्रसन्न असण्याचे कारण म्हणजे अझरबैजानचा शत्रू असलेल्या आर्मेनियाला भारताचा पाठिंबा आहे. अझरबैजान आणि आर्मेनिया या दोन्ही देशांमध्ये नागोर्नो-काराबाख नावाच्या प्रदेशावरून वाद चालू आहे. त्यांच्यात अनेकदा युद्धेही झाली आहेत. आर्मेनियाने भारताकडून अनेक शस्त्रास्त्रे खरेदी केली आहेत. या संदर्भात भारत आणि आर्मेनिया यांच्यात अनुमाने ६ सहस्र कोटी रुपयांचा करार करण्यात आला. या संरक्षण करारावर अझरबैजानने अप्रसन्नता व्यक्त केली होती.
संपादकीय भूमिकाकाश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे त्यावर अन्य कुणी काही बोलण्याची आवश्यकता नाही, असे भारताने अझरबैजानच्या फुटकळ परराष्ट्रमंत्र्यांना ठणकावून सांगितले पाहिजे ! |