Railway Stations Developed like Airports : देशातील १ सहस्र ३०० रेल्वे स्थानकांचा विमानतळांप्रमाणे केला जात आहे विकास !

१२ मीटर पुलांची केली जात आहे उभारणी !

जयपूर (राजस्थान) – देशभरातील १ सहस्र ३०० हून अधिक रेल्वे स्थानके पुनर्विकास आणि ‘अमृत भारत स्टेशन डेव्हलपमेंट स्कीम’ यांतर्गत विकसित केली जात आहेत. या योजनेच्या अंतर्गत फेब्रुवारी २०२३ पासून देशभरातील १ सहस्र २७५ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यास रेल्वे मंत्रालयाने आरंभ केला आहे. या योजनेसाठी २५ सहस्र कोटी रुपयांहून अधिक खर्च करून रेल्वे स्थानकांवर विमानतळासारख्या आधुनिक सुविधा विकसित केल्या जात आहेत. विकसित होत असलेल्या स्थानकांवर १२ मीटर रुंद पूल (एफ्.ओ.बी. – फ्री ऑन बोर्ड) बांधले जातील. हा पूल ‘प्लॅटफॉर्म’शी जोडला जाणार नाही.