China Deploys fighter Jets : चीनने सिक्किमजवळील सीमेवर पुन्हा तैनात केली अत्याधुनिक लढाऊ विमाने !
नवी देहली – चीनने पुन्हा एकदा सिक्किमपासून १५० कि.मी. अंतरावर त्याचे सर्वांत प्रगत लढाऊ विमाने ‘जे-२०’ तैनात केली आहेत. उपग्रहांद्वारे काढण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये हे दिसून आले. ही विमान चीनच्या वायूदलाच्या शिगत्से येथील तळावर तैनात करण्यात आली आहेत. हा तळ भारताच्या सीमेच्या अगदी जवळ आहे. चीनच्या या तैनातीमागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. यावर भारताने कोणताही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
‘जे-२०’ हे चीनमधील पहिले स्टिल्थ लढाऊ विमान (रडार यंत्रणेला माग काढता न येणारे) आहे. हे जगातील सर्वांत धोकादायक लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. या विमानामध्ये लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे.
संपादकीय भूमिकाचीन विश्वासघातकी आणि धूर्त असल्याने त्याच्याकडून अशी कृती होणे अनपेक्षित नाही. चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारताने सदैव सतर्क रहाणेच आवश्यक आहे ! |