हिंदु युवकावरील आक्रमणाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबित !
मुसलमानांनी केले होते आक्रमण
मंड्या (कर्नाटक) – मंड्या जिल्ह्यातील नागमंगल येथील बेळ्ळुरू गावात हिंदु युवकावर झालेल्या आक्रमणाविषयी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याच्या प्रकरणी बेळ्ळुरू पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बसवराज चिंचोळी यांना निलंबित करण्यात आले आहे.
बेळ्ळुरू येथे किरकोळ करणावरून मुसलमान युवकांनी अभिलाष नावाच्या हिंदु युवकावर प्राणघातक आक्रमण केले होते. या संदर्भात केलेल्या तक्रारीकडे पोलीस उपनिरीक्षक बसवराज चिंचोळी यांनी दुर्लक्ष केले, असा आरोप स्थानिकांनी केला होता. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी करत बेळ्ळुरू येथील ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. शेवटी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी या संदर्भातील तक्रार स्वीकारली होती.