आरोपीच्या नावे घेतलेले रक्ताचे नमुने आरोपीच्या आईचेच असल्याची माहिती !
पुणे – ससूनमध्ये २० मे या दिवशी आरोपीच्या रक्ताचे नमुने पालटण्यात आले होते. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या शासनाच्या चौकशी समितीने हे रक्ताचे नमुने आरोपी मुलाची आई शिवानी अग्रवाल यांचे असल्याचे पुढे आले आहे. अन्वेषणासाठी पोलिसांनी शिवानी अग्रवाल यांना संपर्क केल्यावर त्यांचा भ्रमणभाष बंद आढळला. सध्या त्या पसार झाल्या आहेत. यामुळे या प्रकरणात आता त्यांच्यावरही कारवाई होण्याची अथवा अटक होण्याची दाट शक्यता आहे.