श्री ज्वाला नरसिंह यागाच्या वेळी कु. मधुरा मोहन चतुर्भुज यांना आलेल्या अनुभूती
१५.१.२०२४ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात श्री ज्वाला नरसिंह याग झाला. तेव्हा मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. यागाला आरंभ होण्यापूर्वी मला पुष्कळ उत्साह वाटत होता.
२. याग चालू झाल्यावर यागाच्या ठिकाणी चैतन्य पुष्कळ प्रमाणात वाढले.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चेहर्यावर स्मितहास्य आणि पुष्कळ चैतन्य दिसत होते. त्यांचे डोळे अनेक सूर्यांचे तेज एकवटल्याप्रमाणे तेजस्वी दिसत होते. त्यामुळे मला त्यांच्या चेहर्याकडे सतत पहाता येत नव्हते.
४. यागाच्या ठिकाणी डोळे बंद करून बसल्यावर ‘मी एका पोकळीत बसले आहे आणि माझा देह हलका झाला आहे’, असे मला वाटत होते.
५. मला यागाच्या ठिकाणी ‘ॐ’ चा नाद ऐकू येत होता आणि तो ‘ॐ’ मंडल केल्याप्रमाणे माझ्या देहाभोवती फिरत आहे’, असे वाटत होते.
६. आरती चालू झाल्यावर माझा शरणागतभाव जागृत झाला आणि मन शांत झाले.’
– कु. मधुरा मोहन चतुर्भुज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१.२०२४)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |