पंचतत्त्वांचे अधिपती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ।
ग्रंथनिर्मितीच्या सेवेत असलेले साधक श्री. रोहित साळुंके यांच्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी असलेल्या भावापोटी त्यांना सुचलेले काव्य येथे पाहूया.
तुमच्या चरणस्पर्शाने पृथ्वीमाता धन्य होते ।
तुमच्यातील आनंदाच्या लहरींनी अखिल विश्व चिंब भिजते ।। १ ।।
तुमच्या तेजाच्या प्रकाशाने भूमंडळ झळाळून जाते ।
तुमचे चैतन्यकण वायूत पसरून सर्व चैतन्यरूप होते ।। २ ।।
पंचतत्त्वांचे अधिपती असणार्या हे देवराया ।
प्रत्येक जीवमात्राला मोहवणार्या हे गुरुराया ।। ३ ।।
सर्वत्र केवळ तुमचे अन् तुमचेच अस्तित्व अनुभवावे (टीप) ।
तुमच्या अस्तित्वातच आम्हाला विलीन करून घ्यावे ।। ४ ।।
टीप – येथे आधी मी ‘रहावे’, असे लिहिले होते. तेव्हा ‘तुमचे अस्तित्व सर्वत्र आहेच; परंतु मी ते अनुभवायला आणि पहायला न्यून पडतो’, असा विचार माझ्या मनात आला. ही चूक आपल्या कृपेने माझ्या लक्षात आल्यानंतर माझ्याकडून ‘अनुभवावे’, असे लिहिले गेले.’
– श्री. रोहित साळुंके, फोंडा, गोवा. (३.२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |