पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात आवाज उठवणार्या पत्रकाराचे ‘आय.एस्.आय.’कडून अपहरण !
पोलीस कोठडीत असल्याचे १६ दिवसांंनंतर उघड !
मुझफ्फराबाद (पाकव्याप्त काश्मीर) – १६ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेले कवी आणि पत्रकार अहमद फरहाद शाह पाकव्याप्त काश्मीरमधील धिरकोट पोलिसांच्या कह्यात असल्याचे समोर आले आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयात याविषयीची माहिती देण्यात आली.
पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात आवाज उठवणारे कवी अहमद फरहाद हे १४ मे या दिवशी इस्लामाबादमधील त्यांच्या घरातून बेपत्ता झाले होते. अहमद यांच्या कुटुंबियांनी दावा केला होता की, ‘आय.एस्.आय.’ने त्यांना गायब केले आहे; मात्र पाकिस्तान सरकारने हे दावे फेटाळून लावत अहमद आमच्या कह्यात नसल्याचे सांगितले.