North Korea Missiles Test : उत्तर कोरियाने १० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची केली चाचणी !
जपानच्या समुद्रात क्षेपणास्त्रे डागली !
प्योंगयांग (दक्षिण कोरिया) – उत्तर कोरियाने ३० मेच्या सकाळी १० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. ही चाचणी जपानच्या समुद्रात करण्यात आली. याच्या एक दिवस आधी त्याने दक्षिण कोरियाचे लक्ष वळवण्यासाठी दक्षिण कोरियाच्या सीमेवर कचर्याने भरलेले फुगे उडवले होते, तर उत्तर कोरियाच्या उपग्रह प्रक्षेपणाच्या काही तास आधीच दक्षिण कोरियाने दोन्ही देशांच्या सीमेजवळ २० लढाऊ विमानांसह युद्धाभ्यास केला होता.
१. दक्षिण कोरिया आणि जपान यांनी या चाचणीचा तीव्र निषेध केला आहे. उत्तर कोरियाच्या सुनान भागातून ही क्षेपणास्त्रे डागण्यात आली. दक्षिण कोरियाच्या सैन्याने सांगितले की, ही क्षेपणास्त्रे अनुमाने ३५० किमी अंतर कापल्यानंतर समुद्रात पडली.
२. उत्तर कोरियाची ही कृती आमची सुरक्षा आणि शांतता यांना धोका असल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. आमच्या सैन्याने प्रशांत महासागरात पाळत वाढवली आहे.
३. अण्वस्त्रधारी देश बनल्यापासून उत्तर कोरियाशी युद्ध पुकारलेल्या दक्षिण कोरियाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. हे पहाता अमेरिका आणि दक्षिण कोरिया संरक्षण सहकार्य वाढवत आहेत. त्यासाठी सैनिकी सराव केला जात आहे. त्याचसमवेत २७ सहस्र अमेरिकी सैनिक दक्षिण कोरियात तैनात आहेत.