धर्मपालन हेच शाश्वत उत्तर !
हिंदु धर्म हा निसर्ग अनुकूल आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’, असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्यासारख्या संतांनी सांगितलेलेच आहे. वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, तसेच हिंदूंचा कोणताही ग्रंथ, दासबोध, ज्ञानेश्वरी यांसह प्रत्येक संतांच्या भजनांमध्ये निसर्गाचे महत्त्व सांगितलेलेच आहे. हिंदु संस्कृतीत वटपौर्णिमा, तुळशी विवाह यांसह अनेक सणांच्या माध्यमातून आपोआपच वृक्षांचे संवर्धन केले जाते. त्यामुळे हिंदूंनी निसर्ग आणि पर्यावरण यांच्या रक्षणासाठी वेगळे काही करायला हवे असे नाही. त्यामुळे जगाच्या दृष्टीने विचार केल्यास यापुढील काळात जर जागतिक स्तरावर पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल, तर हिंदु धर्मातील तत्त्वांचे आचरण करण्याकडेच आपल्याला वळावे लागेल !
‘माता भूमिः पुत्रोऽहं पृथिव्याः।’ (अथर्ववेद, काण्ड १२, सूक्त १, खण्ड १२) म्हणजे ‘पृथ्वी माझी माता आहे, मी तिचा पुत्र आहे’, असे हिंदु संस्कृती सांगते; हाच भाव आपण जागृत ठेवून कृती करणे आवश्यक !