अनियमिततेच्या कारणास्तव लोकायुक्तांची बेळगाव महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागावर धाड !
बेळगाव – बेळगाव महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात दाखले देण्यासाठी शासकीय शुल्कापेक्षा अधिक मूल्य आकारले जाते, अशा तक्रारी नागरिकांनी लोकायुक्त विभागाकडे केल्या होत्या. त्या तक्रारींची नोंद घेत लोकायुक्तांनी २८ मे या दिवशी बेळगाव महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागावर धाड टाकली. यात लोकायुक्तांनी विभागातील कर्मचारी आणि त्यांचे कामकाज यांची चौकशी केली. (रस्ते, पाणी, स्वच्छता आणि दाखले या किमान सोयी तरी महापालिका प्रशासनाने नागरिकांना देणे अपेक्षित आहे ! मात्र स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही भ्रष्टाचाराची सवय लागलेल्या कर्मचार्यांना नागरिकांना सुविधा देण्यात हात आखडता घेण्यातच स्वारस्य असते ! अशांवर कठोर कारवाई अपेक्षित आहे ! – संपादक)
या संदर्भात पत्रकारांना माहिती देतांना काही नागरिकांनी सांगितले की, सकाळी ७ पासून दाखले घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागतात; मात्र तांत्रिक अडचणींचे कारण देत त्यांना घंटोनघंटे ताटकळत रहावे लागते. येथील कर्मचारी दाखल्यासाठी २ ते ५ रुपये शुल्क असतांना पावती न देता नागरिकांकडून १० ते ३० रुपये घेऊन फसवणूक करत आहेत. महापालिकेच्या या भ्रष्ट कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे.
संपादकीय भूमिकाअनेक वर्षे अधिक पैसे घेतलेल्यांकडून ते वसूल करावेत ! |