सत्पुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनवणे महत्त्वाचे !
आई मुलाची फारतर एका जन्मापर्यंत, म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करील; पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला सिद्ध आहे. त्याला देह नसला, तरी तो नाही, असे समजू नका. सत्पुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनवणे, हा खरा सत्समागम आहे. देहाचे भोग येतील-जातील; पण तुम्ही सदा आनंदात रहा. तुम्हाला आता काही करण्याचे उरले आहे, असे मानू नका. गुरुभेट झाली, म्हणजे तुम्ही उरतच नाही; मात्र गुरूंना अनन्य शरण जा. भगवंताची तळमळ हा साधकपणाचा प्राण आहे.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(‘पू. (प्रा.) के.वि. बेलसरे यांचे आध्यात्मिक साहित्य’ या फेसबुकवरून साभार)