Conflict Between Afganisthan and Pakistan : पाकवर आक्रमण केल्यास अफगाणी लोक भारताला साथ देतील !
अफगाणी लोकांनी व्यक्त केले मत
काबुल – अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्याने माघार घेतल्यानंतर तेथे तालिबान सत्तेवर आले आहे. सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात संघर्ष चालू आहे. अफगाणिस्तानातील सामान्य जनता पाकिस्तानचा द्वेष करीत असल्याचे एका उदाहरणातून समोर आले आहे. अलीकडेच एका भारतीय यूट्यूब चॅनल चालवणार्या व्यक्तीनेे अफगाणिस्तानातून एक व्हिडिओ प्रसारित केला. या व्हिडिओमध्ये अफगाणी लोक, ‘तुम्ही पाकिस्तानवर भारतातून आक्रमण करा, आम्ही इथून करतो; पाकला उद्ध्वस्त करू’, असे म्हणतांना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये ते पुढे म्हणतात, ‘भारत आमचा मित्र आहे, भाऊ आहे. पाकिस्तान आमचा शत्रू आहे. तुम्ही पाकिस्तानवर आक्रमण केल्यास अफगाणिस्तान आणि येथील लोक तुम्हाला साथ देतील.’
अफगाण लोकांमध्ये पाकिस्तानविषयी द्वेष !
सामान्य अफगाणी लोकांमध्ये पाकिस्तानविषयी द्वेष आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. यांपैकी एक म्हणजे युद्धात पाकिस्तानने अमेरिकेला साथ देणे होय. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात अलीकडच्या काळात तणाव दिसून आला आहे. दोन्ही देशांकडून सीमेवर गोळीबाराच्या घटना चालूच आहेत.
संपादकीय भूमिकाभविष्यात जेव्हा ‘इस्लाम धोक्यात आहे’, अशी आवई उठवली जाईल, तेव्हा पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान येथील मुलसमान एकत्र येतील. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे भारतातील हिंदूंनी सतर्क रहाणेच योग्य ! |