सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या निमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात केलेल्या चंडीयागाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या निमित्त अखिल विश्वाच्या कल्याणासाठी सप्तर्षी जीवनाडीपट्टीमध्ये सांगितल्याप्रमाणे १४ आणि १५ मे २०२३ या दिवशी मार्कण्डेयऋषि रचित ‘श्रीदेवीसप्तशती’ मधील ७०० श्लोकांचे मंत्रोच्चारण करून रामनाथी आश्रमात ‘चंडीयाग’ करण्यात आला. देवाच्या कृपेने या यागाचे माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे लेखबद्ध केले आहे. २८.५.२०२४ या दिवशीच्या लेखात आपण आदिशक्तीच्या विविध रूपांचे आध्यात्मिक महत्त्व पाहिले. आज पुढील भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/798066.html
२. आदिशक्तीची विविध रूपे आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व !
टीप – आश्रमातील ‘ चंडीयागाच्या वेळी’ ‘चंडी, चामुंडी, रक्तचामुंडी, उग्रचामुंडी आणि महाचामुंडी किंवा महाचंडी’, ही देवीची विविध रूपे आवश्यकतेनुसार सूक्ष्मातून प्रगट झाली होती. त्यांनी सनातन संस्थेचे साधक, संत, सद्गुरु, तसेच सनातनचे आश्रम यांना त्रास देणार्या अनिष्ट शक्तींचे निर्दालन केल्यामुळे सर्वांवर ७० टक्के इतक्या प्रमाणात आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन त्यांना होणारा अनिष्ट शक्तींचा त्रास पुष्कळ प्रमाणात उणावला.
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान),(आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.५.२०२३)
|