स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात राहुल गांधींना नोटीस !
पुणे – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतियांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. या प्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी प्रविष्ट केलेल्या दाव्यात विश्रामबाग पोलिसांनी अन्वेषण अहवाल न्यायालयात सादर केला आहे. त्यामध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविषयी सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले आहे. या अहवालाच्या आधारे राहुल गांधी यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०४ नुसार कार्यवाहीसाठी नोटीस बजावली जाणार आहे.