Adil’s Death In Police Custody : (म्हणे) ‘अटक करण्यात आलेल्या निरपराध्यांना सोडून द्या !’
|
दावणगेरे (कर्नाटक) – चन्नगिरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या कह्यात असणार्या आदिल याचा मृत्यू झाल्याने मुसलमानांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण केले होते. तसेच येथील वाहनांची जाळपोळही केली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्याां निरपराध्यांना सोडून द्यावे, अशी विनंती आदिल याचे वडील आणि बहीण यांनी केली आहे. या प्रकरणी २५ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक झालेले चन्नगिरी, होन्नेबागी आणि नल्लुरू या गावांतील आहेत.
पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण, भ्रमणभाषद्वारे केलेले चित्रीकरण आणि अन्य व्हिडिओ यांद्वारे आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली आहे.
संपादकीय भूमिकापोलीस ठाण्यावर आक्रमण करणार्यांना ‘निरपराध’ म्हणत त्यांना सोडून देण्याची मागणी करणार्यांवरही कारवाई झाली पाहिजे ! |