राज्यशासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अननुभवी कंत्राटदाराची नियुक्ती !
मुंबई – राज्यशासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने उरण खिंड येथील दरड, तसेच गोरेगाव पूर्वेतील झोपडपट्टी परिसरातील भूस्खलन रोखण्यासाठी अननुभवी कंत्राटदाराची नियुक्ती केली. या कंत्राटदाराला काळ्या सूचीत टाकण्याचा प्रस्ताव प्रलंबित असतांनाच वरिष्ठ अधिकार्याच्या दबावामुळे त्याला पात्र ठरवून हे काम देण्यात आले आहे. (अनुभव नसलेल्या कंत्राटदारामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याला उत्तरदायी कोण ? – संपादक)
यात नेमलेल्या मे. जयभारत कन्स्ट्रक्शनने सादर केलेली प्रमाणपत्रे बनावट असल्याची तक्रार करण्यात आली होती. संबंधित कंत्राटदाराला काळ्या सूचीत टाकण्याचा प्रस्ताव अंधेरी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ६ जानेवारी २०२१ मध्ये सादर केला होता, तरीही या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली.
संपादकीय भूमिकाअसे करणार्या संबंधित अधिकार्यांनाही कंत्राटदारासह कारागृहात डांबायला हवे ! |