मनानुसार साधना करणारे हिंदू ?
हिंदूंना लहानपणापासून धर्मशिक्षण न मिळाल्यामुळे बहुतेकांची भरपूर हानी झाली आहे. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे धर्माभिमान नाही. काही जण तर स्वतःच्या मनाने दुसर्या धर्मियांचे आचरण सहज म्हणून करतात, म्हणजे स्वतःला आवडेल, तशी साधना किंवा भक्ती करतात. अशा कृतींमुळे आपण आपल्या ईश्वरापासून दूर जात असतो, हे त्यांच्या लक्षात येत नाही; म्हणूनच स्वतःच्या मनाने साधना किंवा भक्ती करणे, ही मोठी चूक ठरते. यामुळे आपण भरकटत जातो आणि आपली अपेक्षित अशी उपासना होत नाही. मानवजन्माचे ध्येय मग बाजूलाच रहाते.
काही जण हिंदूंना मुसलमान फकिरांची भक्ती करायलाही सांगतात. काही जण दर्ग्यामध्ये दर्शन घेण्यासाठी जातात. काही जण दर्ग्यावर चादर चढवतात. काही जण उरुसालाही जातात. तिथल्या जत्रेत सहभागी होऊन मुलांना खाऊ, खेळणी खरेदी करतात. काही जण मजारीवर डोके ठेवायला जातात, तर काही जण थडग्यावर जातात. काही जण दर्ग्यावर जाऊन नवस बोलतात. हिंदूंचे ३३ कोटी देव असतांना त्यांना अन्य धर्मीय श्रद्धास्थानांची आवश्यकता का भासते ? तेच लक्षात येत नाही. जो अफझलखान छत्रपती शिवाजी महाराजांचा वध करायला आला होता, त्या क्रूरकर्मा अफझलखानच्या थडग्यावर जाऊन नवस बोलण्याची प्रथा हिंदूंनी चालू केली. ज्यांच्या विरोधात आयुष्यभर खडतर संघर्ष करून छत्रपतींसह त्यांच्या मावळ्यांनी बलीदान केले, त्याची हीच का किंमत आहे ?
५० वर्षांपूर्वी एका मुसलमान फकिराचे थडगे कुणालाच ठाऊक नव्हते. काही धर्मद्रोह्यांनी त्याचा प्रसार करून हिंदूंना त्याकडे वळवले. अशा फकिरांच्या नावाने हिंदूंनी अर्पण केलेले धन हे अन्य अधर्मियांच्याच कामी येते. अशामुळे लोक खर्या भक्तीला खरोखरच मुकतात आणि ते त्यांच्या लक्षात येत नाही.
काही धार्मिक लोक त्यांची भक्ती केल्यामुळे भक्तांच्या व्यावहारिक इच्छा लगेच पूर्ण करतात. त्यांच्याकडून अनेकांना अनुभूती येत असल्याने अनेक जण त्यात फसतात; परंतु हे अतृप्त जीव त्यांच्या भक्तांना मुक्ती देऊ शकत नाहीत; कारण तेच मुक्त नसतात; मात्र अशामुळे खर्या भगवंतापासून भक्त दूर होतात.
भक्तांनी सर्वप्रथम धर्मशिक्षण घेणे चालू केले पाहिजे, तर योग्य साधना कुठली करायची ते त्यांना कळेल. जे स्वतः मुक्त आहेत, तेच इतरांना मुक्ती देऊ शकतात. ते सद्गुरुपदाचे अधिकारी असले पाहिजेत. खर्या संतांच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केली, तरच अंतिम सत्याची ओळख पटेल आणि धर्मशिक्षण घेतले, तर खरे संत आणि खोटे संत यांतील भेद कळेल.
– श्री. श्रीराम खेडेकर, फोंडा, गोवा.