डॉ. तावरे यांनी यापूर्वीही रक्ताचे नमुने पालटले ! – आमदार रवींद्र धंगेकर
पुणे – ससूनचे डॉ. अजय तावरे यांनी यापूर्वी अनेक वेळा रक्ताचे नमुने पालटले, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. २९ डिसेंबर २०२३ या दिवशी डॉ. अजय तावरे यांनी ससूनच्या अधीक्षकपदाचे दायित्व घेतले. तावरे हे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख होते. डॉ. अजय तावरे यांच्या नियुक्तीसाठी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारसपत्र दिले होते, तर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी नियुक्तीचे पत्र दिले होते. हे सर्व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठिंब्यामुळेच होत आहे, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
या प्रकरणी रवींद्र धंगेकर हे खोटे बोलत आहेत. मी इतके दिवस परदेशात होतो आणि मी आजच भारतात परत आलो आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांनी दोन दिवसांत माझी माफी न मागितल्यास मी त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करीन, असा खुलासा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.