मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे बोगदा !
मुंबई – मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीच्या इंटरमीडिएट बोगद्याचे खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्रातील बीकेसी ते शिळफाटा येथील २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामाला गती मिळेल. या बोगद्याचा ७ कि.मी.चा भाग ठाणे खाडी येथे समुद्राखाली असेल. देशात अशा प्रकारचा हा पहिलाच बोगदा उभारण्यात आला आहे.
६ डिसेंबर २०२३ या दिवशी हे खोदकाम चालू करण्यात आले. तज्ञांच्या देखरेखीखाली २७ सहस्र ५१५ किलो स्फोटकांचा वापर करून एकूण २१४ नियंत्रित स्फोट करण्यात आले.