Chakraborty Sulibele Received Veer Savarkar Award : प्रसिद्ध भारतीय लेखक चक्रवर्ती सुलिबेले यांना वीर सावरकर पुरस्कार !
होन्नावर (कर्नाटक) – वीर सावरकर प्रतिष्ठानच्या वतीने प्रसिद्ध भारतीय लेखक चक्रवर्ती सुलिबेले यांना या वर्षीचा वीर सावरकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. २८ मे या दिवशी संध्याकाळी ५.३० वाजता कला मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असे प्रतिष्ठानचे सदस्य राकेश भट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. एक लाख रुपये रोख, वीर सावरकर यांची मूर्ती आणि प्रशस्तीपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
चक्रवर्ती सुलिबेले हे ‘युवा ब्रिगेड’ या संघटनेचे संस्थापक आहेत. त्यांची ही संस्था तरुणांना देशभक्तीसाठी शिक्षित करते. या कार्यक्रमात कादंबरीकार एस्.एल्. भैरप्पा आणि पत्रकार अजित हनुमक्कनवर हे उपस्थित रहाणार आहेत.