Kejriwal Wants Additional Bail : अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयाकडे मागितला ७ दिवसांचा अतिरिक्त जामीन
नवी देहली – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मद्य धोरण घोटाळ्याच्या प्रकरणी अंतरिम जामिनावर बाहेर असून पुढील महिन्यात त्यांना पुन्हा कारागृहात जावे लागणार आहे. त्यांनी न्यायालयाकडे ७ दिवसांचा अतिरिक्त जामीन वाढवून मिळावा, अशी मागणी केली आहे. केजरीवाल यांनी पीईटी-सीटी स्कॅनसह वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी ही मागणी केली आहे. (‘जामिनावर असतांना केजरीवाल यांनी देशभर प्रचारसभा घेतल्या, तेव्हा त्यांना वैद्यकीय चाचण्या करून घ्यायची आठवण आली नाही का ?’, असे सरकार पक्षाच्या वतीने त्यांना विचारण्याची आवश्यकता आहे ! – संपादक)